राहुल गांधी आत्मचिंतन करण्याऐवजी आत्मपराभवाचे जाहीर प्रदर्शन करीत आहेत

 राहुल गांधी आत्मचिंतन करण्याऐवजी आत्मपराभवाचे जाहीर प्रदर्शन करीत आहेत

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :विरोधी पक्षाला, राहुल गांधी आणि काँग्रेसला महाराष्ट्रातील मतदारांनी जो जोरदार फटका दिला त्यातून आजतागायत शुध्दीत आलेले नाहीत असा टोला हाणून मतदार वाढले तर चूक काय? मतदार वाढले त्यामुळे यांच्या पोटात का दुखतंय असा सवाल मंत्री आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

लोकसभेच्या वेळी प्रत्येक मतदान केंद्रावर नावे गायब झाली म्हणून मतदार ओरड करताना दिसत होते. राहुल गांधी तुम्ही मतदारांची नावे गाळून लोकसभेत विजय मिळवला होतात का? राहुल गांधी यांचे वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत असे शेलार माध्यमांशी बोलताना म्हणाले.

या देशातील यंत्रणा, व्यवस्थांबद्दल अनास्था निर्माण करणे हा शहरी नक्षलवाद्यांचा अजेंडा आहे त्याचे तुम्ही प्रवक्ते का बनताय असे विचारत राहुल गांधी आत्मचिंतन करण्याऐवजी आत्मपराभवाचे जाहीर प्रदर्शन करीत आहेत.
जे मतदार विधानसभेला वाढले त्यांचीच नावे गायब करून तुम्ही लोकसभेच्या निवडणूकीत जिंकला होतात का ? हाच राहुल गांधी यांना आमचा सवाल आहे असे शेलार म्हणाले.

उद्धव ठाकरे यांचा जीव हा मुंबई महापालिकेत ब्लॅक लिस्ट झालेल्या कंत्राटदारांमध्ये आणि कटकमिशन मध्ये अडकलाय. जर विरोधी पक्षनेते पद द्यायचेच झाले तर
वडेट्टीवार यांनी सांगावे तुमच्यात एकमत आहे का असेही त्यांनी यावेळी सांगितले विचारले.

ML/ML/PGB
3 Feb 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *