यावर्षी महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी तेवीस हजार कोटींची तरतूद

 यावर्षी महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी तेवीस हजार कोटींची तरतूद

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :यावर्षी म्हणजे सन २०२५-२६च्या केंद्रीय अर्थसंकल्पात राज्यातील रेल्वेसाठी २३,७७८ कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबईतील पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

रेल्वेसाठीच्या अर्थसंकल्पात विविध राज्यांसाठी केलेल्या तरतुदींसाठी आयोजित वार्ताहर परिषदेला वैष्णव यांनी दूर दृश्य पद्धतीने संबोधित केलं. राज्यात होणाऱ्या रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्यात झालेल्या करारामुळे या प्रकल्पांमधला राज्याचा वाटा रिझर्व्ह बँक उचलणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. २०१४पासून आत्तापर्यंत राज्यात एकंदर २,१०५ किलोमीटर लांबीचे नवे रेल्वेमार्ग तयार करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

रेल्वेप्रवास सुरक्षित करण्यासाठी एकंदर १० हजार लोकोमोटिव्ह गाड्यांवर ‘कवच’ यंत्रणा बसवण्याचं काम आहे, सहा वर्षांमध्ये ही यंत्रणा पूर्णत्वाला नेण्याचं ध्येय आहे, असं वैष्णव यांनी सांगितलं.

ML/ML/PGB
3 Feb 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *