पृथ्वीराज मोहोळ यंदाचा नवा महाराष्ट्र केसरी
अहिल्यानगर, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा २०२५ मध्ये गादी विभागाच्या लढतीत पृथ्वीराज मोहोळ विजयी झाला आहे. पृथ्वीराज मोहोळ हा 67 वा महाराष्ट्र केसरी बनला आहे. पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात सामना चांगलाच रंगला होता. तसेच याआधी मोठा गोंधळ देखील झाला होता. गोंधळानंतर अंतिम लढत सुरू करण्यात आली होती. यावेळी पहिल्या फेरीपासूनच पृथ्वीराज मोहोळ आघाडीवर होता. महेंद्र गायकवाड याने मैदान सोडले आणि पृथ्वीराज मोहोळ विजयी घोषित झाला.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गादी विभागातून नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यात उपान्त्य फेरीसाठी सामना रंगला असताना पंचानी दिलेला निर्णय पसंत न पडल्याने शिवराज राक्षे यांनी पंचाला लाथ मारल्याने मोठा गोंधळ उडाला होता. शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली आणि त्यांची कॉलर देखील पकडल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
शिवराज राक्षे म्हणाले, आपण तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकू नये म्हणून आपल्यावर अन्याय करण्यात आला असा आरोप शिवराज राक्षेने केला. तो म्हणाला की, आपले दोन्ही खांदे टेकले नव्हते, पाठही टेकली नव्हती. तसे असेल तर स्वतः हार मानतो. आपल्याला पराभूत करण्यासाठी हे जाणूनबुजून करण्यात आले. त्यावर आपण रिव्ह्युची मागणी केली आहे. सामन्याचा व्हिडीओ पाहून त्यावर निर्णय द्यावा अशी मागणी आपण केली आहे.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गादी विभागातून नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यात उपान्त्य फेरीसाठी सामना रंगला असताना पंचानी दिलेला निर्णय पसंत न पडल्याने शिवराज राक्षे यांनी पंचाला लाथ मारल्याने गोंधळ उडाला आहे. शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली आणि त्यांची कॉलर देखील पकडल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आहे.
SL/ML/SL
2 Feb. 2025