AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती

 AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती

मुंबई, दि.१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरातील पहिले AI विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन होत आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या सहयोगाने माहिती तंत्रज्ञान विभागगाने या कामी पुढाकार घेतला असून आज त्याबाबतच्या टास्कफोर्सची नियुक्ती करण्यात आली, अशी माहिती राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.

महाराष्ट्रामध्ये संशोधन, विकास, कौशल्यवृद्धी, तंत्रज्ञान नवकल्पना आणि धोरण निर्मितीला चालना देण्यासाठी आणि भारत सरकारशी समन्वय साधून जागतिक पातळीवरील उत्कृष्टता तथा नाविन्यतेचे केंद्र तयार करण्यासाठी टास्कफोर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचे शिक्षण देणारे विद्यापीठ तयार करण्याबाबत नियोजन करण्याची जबाबदारी स्थापन करण्यात आलेल्या टास्कफोर्सची असेल आणि त्याबाबतचा शासन निर्णय आज सरकारमार्फत जाहीर करण्यात आला.

भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यात सांगितल्या प्रमाणे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी ही संकल्पना पूर्ण करण्यात आघाडी घेतली असून याबाबत दोन बैठका घेऊन तातडीने टाक्स फोर्स नियुक्ती करुन या कामाला मुर्त स्वरूप दिले आहे.

उत्कृष्टता तथा नाविन्यतेचे केंद्र असलेल्या AI महाविद्यालया संबंधित नियोजनासाठी टास्कफोर्समध्ये खालील सदस्यांचा समावेश असेल

प्रधान सचिव, माहिती तंत्रज्ञान यांच्या अध्यक्षतेखाली पुढील सदस्यांची टास्कफोर्स समिती नेमण्यात आली आहे. या टास्कफोर्समध्ये उच्च – तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, उद्योग, उर्जा – कामगार विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, भारतीय तंत्रज्ञान संस्था(IIT) पवई, मुंबईचे संचालक, भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) मुंबईचे संचालक, नॅस्कॉम् चे प्रतिनिधी, AI चे प्रतनिधी, ईलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार येथील वरिष्ठ दर्जाचे अधिकारी राजीव गांधी विज्ञान तथा तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, संभाजीनगर चे कार्यकारी संचालक, ब्रम्हा रिसर्च फाउंडेशन, मुंबईचे प्रतिनिधी, प्रमुख एआय गुगल इंडियाचे प्रतिनिधी नरेन कचरु, एआय डीवीजन महिंद्रा ग्रुपचे सीइओ भुवन लोढा, ऍटलस स्किलटेक विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजन वेळूकर, क्यूएनयू लॅब्जचे सीईओ, डेटा सिक्युरीटी कौन्सिल ऑफ इंडियाचे सिईओ, विनायक गोडसे, इंडियन नेव्ही प्रतिनिधी, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचे सीएमडी, एल अँड टी चे प्रतिनिधी आणि माहिती तंत्रज्ञान संचालनालय मुंबईचे कक्ष अधिकारी यांचा समावेश असेल.

ML/ML/SL
1 Feb. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *