डांबर चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

 डांबर चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

कराड, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने डांबर चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला ताब्यात घेतले आहे. या चोरट्यांकडून दोन लाख रुपये किमतीचे चार टन डांबर व १५ लाख रुपये किमतीचा टँकर असा १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राजेश जसवंत सिंग (वय ४०), विजयपाल उमेद सिंग (वय २९ दोघेही रा. भुटोली, ता. निमकथाना, जि. सिक्कर, राजस्थान), प्रतीक अशोक बोरकर (वय २५ रा. एकोडी, ता. वारासोणी, जि. बालाघाट, मध्यप्रदेश) व आदम दादाहयात शेख ( वय ४२, रा. चेंबूर- मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या टोळी सदस्यांची नावे असून, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुर्ली गावच्या हद्दीतील लिनोफ डांबर बॅचमिक्स कंपनीच्या डांबर प्लॅन्टमधून चार टन डांबर व टँकर असा मुद्देमाल चोरून नेल्याबाबत उद्योजक उदय धनाजीराव जाधव (रा. सैदापूर- कराड) यांनी कराड ग्रामीण पोलिसात तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी कराड ग्रामीण गुन्हे प्रकटीकरण शाखेला तपासाच्या सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक जगताप यांना चोरी करणारे परप्रांतीय कामगार हे बॅगा घेऊन त्यांच्या मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असल्याची खबर सूत्रांकडून मिळाली. यावर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सुर्ली भागात सापळा त्यांना तत्काळ ताब्यात घेतले.

SL/ML/SL

30 Jan 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *