मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात ‘ड्रेस कोड’ लागू

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथील प्रभादेवी येथील सुप्रसिद्ध सिद्धिविनीयक मंदिरात जाण्यासाठी आता पारंपरिक पोशाख घालणे बंधनकारक होणार आहे. काही भक्तांच्या तक्रारी, सूचना न्यासाकडे प्राप्त झाल्या होत्या. काही भाविकांचे पेहराव समोरच्याला संकोच वाटणारे असायचे, त्यामुळेच ड्रेस कोडबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. सिद्धिविनायक हे मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांपासून ते बॉलिवूज सेलिब्रिटी, उद्योजक यांचे श्रद्धास्थान म्हणून देशभर प्रसिद्ध आहे. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट न्यासाकडून ड्रेस कोडबाबत एक अधिकृत पत्र काढण्यात आलं आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांनी आता भारतीय पारंपरिक वेषात, अंगभर कपडे घालून मंदिरात येणं आवश्यक असणार आहे. या कपड्यांमध्येच मंदिरात प्रवेश दिला जाईल, अन्यथा प्रवेश दिला जाणार नाही, असं न्यासाकडून सांगण्यात आलं आहे.
सिद्धिविनायक मंदिरात पुढच्या आठवड्यापासून आचारसंहिता ड्रेस कोडवर ठेवली आहे. मंदिरात येणाऱ्या भक्तांनी शालिनता आणि मंदिराचं पावित्र जपणारा पेहराव करावा. बाप्पाच्या दर्शनासाठी येताना मंदिराचं पावित्र नष्ट होणार नाही अशा प्रकारचा पेहराव भाविकांचा असावा. नेमका पेहराव कसा करावा यावर बंधन नाही, मात्र जो पेहराव कराल तो दुसऱ्याला संकोच वाटणारा नसावा. म्हणजेच समोरच्या लोकांना लाजवतील किंवा त्यांना संकोच वाटेल असे कपडे नसावेत. तसंच तोकड्या कपड्यांवर बंदी असणार आहे. महिला, पुरुषांनी शॉर्ट पँट घालू नये. अंगभर कपडे असलेला पेहराव करावा. असे मंदीर न्यासाने म्हटले आहे.
SL/ML/SL
28 Jan. 2025