अंधेरीतील एन. जे. वाडिया आरोग्य केंद्र नवीन जागेत स्थलांतरित

 अंधेरीतील एन. जे. वाडिया आरोग्य केंद्र नवीन जागेत स्थलांतरित


मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महानगरपालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागातील एन. जे. वाडिया आरोग्य केंद्र व दवाखान्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामाच्या पार्श्वभूमीवर, सदर आरोग्य केंद्र व दवाखाना तात्पुरत्या स्वरूपात नवीन ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
एन. जे. वाडिया आरोग्य केंद्र व दवाखाना, बी. एम. सी. जिमखाना, गिलबर्ट हिल, सागर सिटी शाळेजवळ, अंधेरी (पश्चिम), मुंबई येथे
तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आले आहे.
पालिकेने नागरिकांना या आरोग्य केंद्राच्या नवीन जागेची नोंद घेऊन वैद्यकीय सेवा व सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. दुरुस्तीच्या कामानंतर मूळ ठिकाणी सेवा पुन्हा सुरू करण्याची योजना आहे.

ML/ML/PGB 28 Jan 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *