आयुध निर्माण कंपनी स्फोट, आणखी अडीच टन आरडीएक्स ढिगाऱ्याखाली
भंडारा, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भंडारा जिल्ह्यातील जवाहर नगर येथील आयुध निर्माण कारखान्यात आज झालेला स्फोटात आतापर्यंत आठ लोकांचा मृत्यू झालेला आहे, तर पाच लोक गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. काल रात्री बचाव कार्य थांबले असले तरी घटनास्थळी अडीच टन आरडीएक्स दबलेला असल्याने आज पुन्हा हे आरडीएक्स ढिगाऱ्यखालून काढण्याचे कार्य केले जाणार असल्याचे पोलीस महानिरीक्षक यांनी सांगितले.
घटनेनंतर दोन फेज मध्ये बचाव कार्य करण्यात आलेला आहे. हायड्रोलिक क्रेन जास्त क्षमतेच्या मशीनरी बोलून बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं होतं. पहिल्या टप्प्यात काढण्यात आलेल्या 6 लोकांपैकी 5 लोक वाचलेत. मात्र दुसऱ्या टप्प्यात सुरू केलेल्या बचाव कार्यात काढण्यात आलेले 7 ही लोकांना वाचविता आले नाही.
ही घटना कशामुळे घडली याचा तपास करण्यात येणार आहे. तर त्या ठिकाणीं असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
बचाव कार्यात स्थानिक प्रशासन आणि पोलीस विभागाने चांगले कार्य केले मात्र NDRF च्या टीमने मोठ्या कुशलतेने हे सर्व लोकांना बाहेर काढण्यात मोलाची भूमिका पार पाडली आहे.
ML/ML/SL
25 Jan. 2025