मोडाळे ग्रामपंचायतीला मिळाला पंचायतराज विकास पुरस्कार…
नाशिक, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :केंद्र शासनाच्या पंचायत राज विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पंचायत राज पुरस्कारांतर्गत नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील मोडाळे या ग्रामपंचायतींला पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायतराज विकास पुरस्कार अंतर्गत स्वच्छ तथा हरित गाव या संकल्पनेकरिता पुरस्कार मिळाला आहे, ११ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला.
केंद्र शासनाच्या वतीने पंचायत राज संस्थांना त्यांच्या सामाजिक , आर्थिक संरचनेतील उल्लेखनीय सुधारणांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच गौरव करण्यासाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार देण्यात येतात, या पुरस्कारांची नामांकने ऑनलाईन प्रणालीवर भरून फ्रीझ करून राज्य शासनास पाठविण्यात येतात.
त्यानुसार ग्रामपंचायत स्तरावर, ब्लॉक स्तरीय समिती तथा जिल्हा स्तरीय समिती यांनी प्रस्तावांची छाननी करून उच्चतम गुणवत्तेनुसार पंचायत राज संस्थांचे प्रस्ताव राज्य शासनास ऑनलाईन प्रणालीवर सादर केले जाते. नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली संनियंत्रणाखाली पंचायत राज पुरस्कारांबाबत कार्यवाही करण्यात आली. इगतपुरी तालुक्यातील मोडाळे ग्रामपंचायतीने स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविले असून माझी वसुधरा अंतर्गत वृक्ष लागवड करुन त्यांचे संगोपन केले आहे.
ध्येयांसाठी काम…
मोडाळे ग्रामपंचायतीस राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. मोडाळेसह जिल्ह्यातील गावांनी गावाच्या सर्वागीण विकासासाठी तसेच १७ शाश्वत विकासाची ध्येये , गरिबीमुक्त आणि उपजिविका वृद्धीस पोषक गाव, आरोग्यदायो गाव, बालस्नेही गाव, जल समृद्ध गाव, स्वच्छ तथा हरित गाव, पायाभूत
सुविधायुक्त स्वयंपूर्ण गाव, सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव, सुशासनयुक्त गाव आणि लिंग समभाव पोषक गाव या ९ विषयांवर काम केले.
नाशिक जिल्ह्यातील मोडाळे ग्रामपंचायतीस राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ही आनंदाची तसेच अभिमानाची बाब आहे. जिल्ह्यातील गावांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी व १७ शाश्वत विकासाची ध्येये, गरिबीमुक्त आणि उपजीविका वृद्धीस पोषक गाव, आरोग्यदायी गाव, सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव, सुशासनयुक्त गाव आणि लिंग समभाव पोषक गाव या विषयांवर काम करावे. असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले.
ML/ML/PGB 23 Jan 2025