डाबर इंडिया आणि पतंजली आयुर्वेद न्यायालयात आमनेसामने
नवी दिल्ली, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अनेक वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत पाय रोवून उभी असलेली, आयुर्वेदीक औषधे निर्मिती कंपनी डाबर इंडिया आणि गेल्या काही वर्षांत उद्यास आलेली पतंजली आयुर्वेद ही कंपनी आता न्यायालयात एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. डाबर इंडिया आणि पतंजली आयुर्वेद च्यवनप्राशच्या जाहिरातीवरून कायदेशीर लढाईसाठी दिल्ली न्यायालयात पोहचले आहेत. डाबरने दावा केला आहे की, पतंजलीच्या जाहिरातीतून दिशाभूल करणारी माहिती परवण्यात येत आहे. असे करताना पतंजलीने सर्व सीमा ओलांडल्या आहेत. दरम्यान, पतंजली त्यांच्या दिशाभूल करणाऱ्या दाव्यांमुळे आणि जाहिरातींमुळे यापूर्वीही अनेकवेळा चर्चेत आली आहे.
पतंजलीचीच्या एक जाहिरातीमुळे हे प्रकरण आता न्यायालयात पोहचले आहे. डाबरच्या म्हणण्यानुसार, पतंजलीने त्यांच्या एका जाहिरामुळे डाबर च्यवनप्राशच्या ग्राहकांची दिशाभूल होत आहे. पतंजलीने एका जाहिरातीत, त्यांच्या च्यवनप्राशमध्ये ५१ औषधी वनस्पती असल्याचे म्हटले आहे. पण हे दाखवताना त्यांची जाहिरात डाबरच्या च्यवनप्राशमध्ये केवळ फक्त ४० औषधी वनस्पती असल्याचे सूचित केले जात आहे.
याचबरोबर पतंजलीच्या जाहिरातीत कथितपणे डाबरच्या च्यवनप्राशमध्ये मर्क्युरी असल्याचे म्हटले आहे. यावर आक्षेप घेत डाबरचा असा युक्तिवाद आहे की, यामुळे केवळ त्यांची प्रतिष्ठाच खराब होत नाही तर ग्राहकांचा आमच्यावर अनेक दशकांपासून असलेल्या विश्वासालाही तडा जात आहे.
दुसरीकडे, या प्रकरणावर पतंजलीने आपले म्हणणे मांडत त्यांच्या जाहिरातीत काहीही चुकीचे नसल्याचे सांगत, हा शोऑफ असल्याचे म्हटले आहे. जाहिरात धोरणाद्वारे प्रत्येक ब्रँड त्यांच्या स्पर्धकांना लक्ष्य न करता त्यांच्या उत्पादनांबद्दल माहिती देत असतात. पतंजलीचे पुढे म्हटले आहे की, त्यांनी जाहिरातीत डाबरचे नाव घेतले नाही किंवा उत्पादनांची थेट तुलना केलेली नाही.
SL/ML/SL
23 Jan. 2025