WHO मधून अमेरिकेने घेतली Exit

 WHO मधून अमेरिकेने घेतली Exit

वॉशिग्टन डीसी, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून काल दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी एकापाठोपाठ एक कठोर निर्णयांचा धडाका लावला. मागास आणि विकसनशील देशांसह संपूर्ण जगासाठी महत्त्वाच्या असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा अत्यंत दूरगामी परिणाम करणारा धक्कादायक निर्णय ट्रम्प यांनी जाहीर केला. यामुळे आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून मिळणारी आर्थिक मदत बंद होणार असल्याने या निर्णयामुळे खळबळ माजली आहे.

अमेरिकेत जन्म होताच परदेशी नागरिकांच्या अपत्याला आपोआप अमेरिकेचे नागरिकत्व बहाल करणारा कायदाही ट्रम्प यांनी त्वरित रद्द केला. त्यामुळे अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या स्थलांतरितांच्या अस्तित्वाचा प्रश्न आ वासून उभा ठाकला असून, या निर्णयाचा सर्वाधिक फटका भारतीयांना बसणार आहे. या दोन कठोर निर्णयांसह ट्रम्प यांनी देशाच्या दक्षिण सीमेवर आणीबाणी लागू केली आहे. मेक्सिकोमधून अमेरिकेत बेकायदेशीरपणे शिरणाऱ्या स्थलांतरितांना रोखण्यासाठी आणि मेक्सिकोमधून होणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आहे.

अमेरिका हा देश या WHO चा सर्वात मोठा देणगीदार राहिला आहे. 2024-25 च्या संघटनेच्या वार्षिक महसुलापैकी सर्वाधिक 662 दशलक्ष डॉलरचा म्हणजेच एकूण देणग्यांपैकी 19 टक्के योगदान अमेरिकेने दिले होते. यावरून जागतिक आरोग्य संघटनेसाठी अमेरिका हा देश सदस्य असणे हे किती महत्त्वाचा आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे संघटनेचा आधारस्तंभ मानला जाणारा अमेरिका देशच या संघटनेतून बाहेर पडला तर संघटना अडचणीत येणार आहे. जागतिक आरोग्य संस्थेच्या माध्यमातून जगभरात पसरणाऱ्या साथीच्या आजारांवर संशोधन आणि आजारांवर मात करण्यासाठी उपाययोजना, साथीच्या रोगांवर प्रतिबंधात्मक लशींची निर्मिती आणि पुरवठा, साथ पसरल्यास गरीब व विकसनशील देशांना आवश्‍यक औषधे पुरवणे अशा स्वरुपात जागतिक आरोग्य संघटना जगभरातील देशांना वैद्यकीय सुविधा पुरवते. मानवतेच्या दृष्टीने कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांवरही जागतिक आरोग्य संघटना जगभरात मदत पुरवते.

SL/ML/SL

22 Jan. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *