वाहतूक नियमांचे उल्लंघन थांबवण्यासाठी आता महामार्गांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे
महाराष्ट्रातील महामार्गांवर आता २० किमीच्या अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातून सुरुवात होत, राज्यातील ९० महामार्गांवर ही योजना लागू केली जाणार आहे. यामध्ये अपघात रोखण्यासाठी आधुनिक इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (आयटीएमएस) तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनांवर तातडीने कारवाई करण्यासाठी ६०० कोटींचा खर्च होणार असून, यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा आहे. ३२ हजार किलोमीटर लांब महामार्गांना या योजनेंतर्गत कव्हर केले जाणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि अपघात टाळावेत, यासाठी हा पुढाकार महत्त्वाचा ठरणार आहे.