लवकरच लाँच होणार Maruti Suzuki ची पहिली इलेक्ट्रीक कार

 लवकरच लाँच होणार Maruti Suzuki ची पहिली इलेक्ट्रीक कार

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील लोकप्रिय Automobile कंपनी Maruti Suzuki आता लवकरत पहिलीवहिली इलेक्ट्रीक कार लाँच करणार आहे. या कारविषयी कमालीची उत्सुकता आहे. कंपनीने नव्या कार बाबत देऊ केलेल्या माहितीमुळे लोकांच्या कुतूहल आणखीनच भर पडली. हीची वैशिष्ट लक्षात घेता Family car च्या संकल्पनेत ही अगदी योग्य प्रकारे बसणार आहे.

मारुतीकडून करण्यात येत असलेल्या दाव्यानुसार फुल चार्जमध्ये ही कार 500 किमी इतका टप्पा ओलांडू शकते. टोयोटाशी हातमिळवणी करत Heartect-E platform च्या धर्तीवर तयार करण्यात आलेल्या या कारमध्ये विविध क्षमतेच्या बॅटरीचे मॉड्युल कंपनीकडून उपलब्ध करून दिले जात आहेत.

कंपनीनं जारी केलेल्या टीझरनुसार कारला ट्राय स्लॅश एलईडी डेटाईम रनिंग लाईट डिझाईन देण्यात आले असून, काहीसं मोठं बोनेट आणि मारुती सुझूकीचा दर्शनीय स्थळी असणारा लोगो हे कारच्या बाहेरील लूकमधील काही विशेष. 18 इंचांचे अलॉय व्हील्स, सी पिलर माऊंटेड डोअर हँडल आणि कारच्या टेललाईटही अनोख्या पद्धतीनं डिझाईन केल्या आहेत.

ही कार 49 kWh आणि a 61 kWh या दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. जिथं ग्राहकांना टू व्हील आणि फोर व्हील ड्राईव्ह असे कॉन्फीग्युरेशन निवडता येणार आहेत. या बॅटरीचं साधारण वजन 600 ते 700 किलो असेल असं सांगितलं जात आहे.

कारमध्ये अद्ययावत इन्फोटन्मेंट सिस्टीम, प्रवाशांच्या सोयीची आसनव्यवस्था, योग्य लेगस्पेस अशा गोष्टींसह पॅनोरॅमिक सनरुफ, स्वयंचलित क्लायमेट कंट्रोल, 360 डिग्री कॅमेरा आणि ड्यावर असिस्टंसही उपलब्ध आहे. मारुती सुझूकी कंपनीकडून ही कार साधारण 20 ते 25 लाख रुपये इतक्या किमतीला विकली जाऊ शकते. Family साठी EV खरेदी करायच्या विचारात असाल तर, मारुतीची ही कार तुमच्यासाठी एक उत्तम पर्य़ाय ठरू शकते.

mmcnews mmcnews

Related post