ISRO ला Unmanned Docking मोहिमेत यश
नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ISRO च्या ने आज आणखी एक ऐतिहासिक केली आहे. अंतराळात दोन अंतराळयानांना एकत्र जोडण्याची (डॉकिंग) अत्यंत महत्वाकांक्षी आणि तेवढीच आव्हानात्मक मोहीम इस्रोने यशस्वी केली. आज सकाळी इस्रोचा हा डॉकिंगचा प्रयोग यशस्वी झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे अभिनंदन करत येत्या काळातील अनेक महत्त्वाच्या योजनांच्या दृष्टीने हे मोठे पाऊल आहे, असे म्हटले आहे.
इस्रोने ३० डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून या स्पेस डॉकिंग मोहिमेचे प्रक्षेपण केले होते. मोहिमेअंतर्गत पीएसएलव्ही-सी६० या रॉकेटच्या साह्याने पृथ्वीपासून ४७० किलोमीटर अंतराळात दोन याने सोडण्यात आली होती. अंतराळात दोन अंतराळयानांना यशस्वीरीत्या डॉक करणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. याआधी केवळ रशिया, अमेरिका आणि चीनलाच हे यश मिळाले आहे.
चांद्रयान-4, गगनयान आणि भारतीय अंतराळ स्थानकासारख्या मोहिमा या मोहिमेच्या यशावर अवलंबून होत्या. चांद्रयान-4 मोहिमेत चंद्राच्या मातीचे नमुने पृथ्वीवर आणले जातील. गगनयान मोहिमेत मानवाला अवकाशात पाठवले जाणार आहे.
इस्रोने 30 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून अंतराळ डॉकिंग प्रयोग मोहीम प्रक्षेपित केली होती. या अंतर्गत PSLV-C60 रॉकेटच्या सहाय्याने पृथ्वीपासून 470 किमी वर दोन अंतराळ यान तैनात करण्यात आले.
7 जानेवारी 2025 रोजी या मोहिमेत दोन अंतराळयान जोडले जाणार होते, परंतु ते पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर 9 जानेवारीला डॉक करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र अंतराळयान 3 मीटरच्या जवळ आणल्यानंतर तांत्रिक अडचणींमुळे डॉकिंग होऊ शकले नाही.
SL/ML/SL
16 Jan. 2025