भरधाव कंटेनरने 15 गाड्यांना दिली धडक, चाकण शिक्रापूर रस्त्यावरील थरार
चाकण शिक्रापूर रस्त्यावर भरधाव कंटेनरकडून दहा ते पंधरा गाड्यांना धडक दिल्याची घटना बुधवारी घडली आहे. ही ध़डक इतकी जोरदार होती की यात त्या गाड्यांचा चुराडा झाला. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. सुरूवातीला कंटेनर चालकाने चाकणमधील माणिक चौकात तीन महिलांना उडवले. त्यानंतर पळून जाण्याच्या हेतूने तो भरधाव वेगात निघाला. पोलिसांनी पाठलाग सुरु केल्याचे पाहून तो इतर वाहनांना धडक देत पुढे जात राहिला. एका ठिकाणी पोलीस त्याला पकडण्यासाठी उभे होते, तेव्हा पोलिसांच्या वाहनाला सुद्धा त्याने उडवले. चालकाला शिक्रापूर हद्दीत नागरिकांनी अडवत चांगलाच चोप दिला आहे. शिक्रापूर पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा व्हिडिओ नंतर चांगलाच व्हायरल झाला.