स्थानिकांचा नकार , यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक उभारण्याच्या आशा मावळल्या.
![स्थानिकांचा नकार , यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक उभारण्याच्या आशा मावळल्या.](https://mmcnewsnetwork.com/wp-content/uploads/2025/01/108333722_3566ce4d-7f8b-4ace-8036-0b054977a26b.jpg.webp)
सांगली दि १६– आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे मूळचे सांगली जिल्ह्यातील आहेत. देवराष्ट्रे या गावात त्यांचा जन्म झाला. विटा , कराड, सातारा आणि मुंबई , नंतर दिल्ली येथे त्यांचे वास्तव्य राहिले. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे देवराष्ट्रे या जन्म गावी स्मारक व्हावे असा प्रयत्न गेले अनेक वर्षे सुरू आहे. पण स्थानिक लोकांनी जागा देण्यास विरोध केल्यामुळे या स्मारकाचे काम रखडले आहे.
याबाबतचा अहवाल सांगली येथील जिल्हाधिकाऱ्यानी शासनाकडे पाठविला आहे. स्मारकासाठी पर्यायी जागेचा शोध सुरू आहे परंतु प्रशासनाला त्याबाबत यश आले नाही. मुंबई येथे यशवंतराव चव्हाण भवन याआधीच उभारण्यात आले आहे मात्र त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त देवराष्ट्र येथील घराच्या परिसरात स्मारक उभारण्याचे काम राहून गेले आहे. त्यासाठी राज्य सरकारने अडीच कोटी रुपयांची तरतूद आधीच करून ठेवली आहे.