सुनीता विलियम्स पुन्हा एकदा Spacewalk साठी सज्ज

 सुनीता विलियम्स पुन्हा एकदा Spacewalk साठी सज्ज

न्यूयॉर्क, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अनेक महिन्यांपासून अंतराळ स्थानकात अडकून पडलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स दोन आठवड्यांत दोन स्पेसवॉक करण्यास सज्ज झाल्या आहेत. NASA नं दिलेल्या स्टेटमेंटनुसार सुनीता विलियम्स 16 जानेवारीला निक हेग सोबत इंटरनॅशल स्पेस स्टेशन (ISS) च्या बाहेर पडून स्पेसवॉक करतील, ज्याच्या माध्यमातून स्टेशन अपग्रेड पूर्ण होतील. त्याचबरोबर 23 जानेवारीला आणखी काही अपग्रेड पूर्ण केले जातील जेव्हा सुनीता विलियम्स बूच विल्मोर सोबत आणखी एका स्पेसवॉकमध्ये सहभागी होणार आहेत.

अमेरिकन स्पेस एजन्सीच्या मते पहिल्या स्पेसवॉकचे नाव ‘US spacewalk 91’ असेल तर 23 जानेवारी रोजी होणाऱ्या दुसऱ्या स्पेसवॉकचे नाव ‘US spacewalk 92’ असे ठेवण्यात आले आहे. पहिला स्पेसवॉक सकाळी 8 वाजता सुरु होईल आणि सुमारे साडेसहा तास चालेल. तर दुसरा स्पेसवॉक सकाळी 7.15 वाजता सुरु होईल आणि साडेसहा तासांत पूर्ण होईल.

नासानं दिलेल्या माहितीनुसार पहिल्या स्पेसवॉक दरम्यान अंतराळवीर निक हेग आणि सुनीता विलियम्स एक रेट जायरो असेम्बली बदलतील, ज्यामुळे स्टेशनची दिशा नियंत्रित करता येते. तसेच न्यूट्रॉन स्टार इंटेरियर काम्पोजिशन एक्सप्लोरर (NICER) या एक्सरे टेलिस्कोपचे डॅमेज झालेल्या लाईट फिल्टरची दुरुस्ती केली जाईल. त्याचबरोबर एका इंटरनॅशनल डॉकिंग अडॅप्टरवरील नेव्हिगेशनल डेटासाठी वापरण्यात येणार रिफ्लेक्टर डिवाइस बदलला जाईल. दोन्ही अंतराळवीर मिळून भविष्यातील मेंटेनन्सच्या कामी येणारा अल्फा मॅग्नेटिक स्पेक्ट्रोमीटरचा अ‍ॅक्सेस एरिया आणि कनेक्टर टूल्सची तपासणी देखील करतील. हा हेग यांचा चौथा तर विलियम्स यांचा आठवा स्पेसवॉक असेल.

दुसऱ्या स्पेसवॉकमध्ये बूच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स मिळून स्पेस स्टेशनच्या ट्रस मधून रेडिओ फ्रिक्वेन्सी ग्रुप अँटेना असेम्ब्ली काढून टाकतील, डेस्टिनी लॅब आणि क्वेस्ट एअरलॉक इथून सर्फेस मटेरियलचे नमुने गोळा करतील ज्यामुळे समजेल स्पेसस्टेशनच्या बाहेरील बाजूस सुक्षजिव जगू शकतात का यावर संशोधन करता येईल. तसेच Canadarm2 साठी अतिरिक्त एल्बो जॉईंट बनवण्याचे काम देखील केले जाईल.

सुनीता यांनी शेवटचा स्पेसवॉक 2012 मध्ये केला होता. तेव्हा त्यांच्या सोबत अंतराळवीर अकिहिको होशिडे होते. एकेकाळी जास्त काळ स्पेसवॉक करणारी महिला अंतराळवीर असा विक्रम त्यांच्या नावावर होता, त्यांनी एकूण 50 तास आणि 40 मिनिटे स्पेसवॉक केला होता.

SL/ML/SL

13 Jan. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *