सिंधुदुर्गच्या समुद्रात होणार समुद्री घोड्यांच्या संवर्धन प्रकल्प

 सिंधुदुर्गच्या समुद्रात होणार समुद्री घोड्यांच्या संवर्धन प्रकल्प

सावंतवाडी, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समुद्र विविध समुद्रीजीवांनी समृद्ध आहे. स्वच्छ, नितळ पाण्यामुळे येथील समुद्र देशभर लोकप्रिय आहे. स्कूबा डायव्हींग द्वारे येथे भेट देणाऱ्या पर्यंटकाना अनोख्या सागरी जीवांचे दर्शन होते. यातलाच एक अनोखा प्राणी म्हणजे समुद्री घोडा म्हणजे घोड्यासारखे तोंड असणारा मासा. सिंधुदुर्गच्या समुद्रात समुद्री घोड्यांच्या अधिवासाबरोबरच त्यासाठीची पोषक परिस्थिती असल्याने या ठिकाणी समुद्री घोड्यांसाठी संवर्धन, प्रजनन केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे. समुद्री घोड्यांची संख्या वाढवून त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या अधिवासाच्या निर्मितीसाठी ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ ने (बीएनएचएस) वनविभागाच्या ‘कांदळवन प्रतिष्ठान’ने पुढाकार घेतला असून, जिल्ह्यातील आचरा किंवा मिठमुंबरी या भागात संवर्धन, प्रजनन केंद्र उभारण्याचे ‘बीएनएचएस’ने ठरविले आहे.

समुद्री घोड्यांच्या संख्येला आणि अधिवासाला असलेला धोका लक्षात घेऊन ‘बीएनएचएस’ने सिंधुदुर्गमध्ये समुद्री घोड्यांसाठी संवर्धन, प्रजनन प्रकल्प तयार करण्याचे ठरविले आहे. हा प्रकल्प सात कोटी रुपयांचा असून, या माध्यमातून समुद्री घोड्यांचे प्रजनन आणि त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या अधिवासाची निर्मिती करण्यात येणार आहे. सिंधुदुर्गात आचरा किंवा मिठमुंबरी भागात संवर्धन प्रजनन केंद्र उभारण्याचे ‘बीएनएचएस’ने ठरविले आहे.

SL/ML/SL

11 Jan. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *