परळीत विधानसभा निवडणुकीत 201 बुथवर हल्ले

 परळीत विधानसभा निवडणुकीत 201 बुथवर हल्ले

मुंबई दि.१० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : परळी मतदार संघात 201 बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आले, शाई लावायची आणि बाहेर जायचे, मतदान केंद्राच्या आतमध्ये तुमचे बटन दाबण्याचे काम ही गँग करायची असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी परळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राजेसाहेब देशमुख देखील उपस्थित होते.

जितेंद्र आव्हाड बोलताना म्हणाले की, विधानसभा निवडणुकीनंतर लोकांच्या मनामध्ये ईव्हीएम आणि निवडणुकी संदर्भात अनेक शंका निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षाचे परळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख हे होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रात जात होते. परळी विधानसभा मतदारसंघात एकूण 396 बुथ आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या धांदलीनंतर उच्च न्यायालयाने 122 बुथ अतिसंवेदनशील असल्याचे म्हटले होते. या बुथवर अतिरिक्त सुरक्षा पूर्व असे म्हटले होते. या बुथवर सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी जिल्हा अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच निवडणूक अधिकाऱ्यांची होती. मात्र या निवडणुकीत 201 बुथवर हल्ले झाले होते. तर 101 बुथ कॅप्चर करण्यात आले होते असा आरोपही आव्हाड यांनी यावेळी केला.

आव्हाड पुढे म्हणाले की, निवडणूक आयोग बेशरम लोकांचा अड्डा झाला आहे आणि तो सत्ताधाऱ्यांना मदत करत आहे. निवडणूक अधिकाऱ्यांना आमचे आव्हान आहे की, बूथ कॅप्चरिंगवर त्यांनी स्पष्टीकरण द्यावे.
परळीमध्ये बूथ कॅप्चर करताना गोट्या गितेचा व्हिडीओ आम्ही दिलाय, त्याला ताब्यात घेणार का? निवडणूक आयोगाने याची गांभीर्याने नोंद घ्यावी, संबंधित अधिकाऱ्यांचे लेखी जबाब त्यांनी जनतेसमोर द्यावे. गोपीनाथराव मुंडे जेव्हा बीडचे नेतृत्व करत होते तेव्हा इतका माजोरडेपणा तिथे नव्हता. जातीयवादाच्या नावाखाली तुम्ही कुणाला वेडे बनवत आहात? बीडचं वाटोळं करणाऱ्या एसपी, कलेक्टर तसेच संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील आव्हाड यांनी केली आहे.

यावेळी उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी म्हटले की, मतदानाच्या वेळी मतदान केंद्रात मतदान करण्याचा अधिकार मतदारांना नव्हता मतदारांना मतदान कार्ड दाखवल्यानंतर त्यांच्या बोटावर शाई लावण्यात येत होती. मात्र त्यांचा मतदानाचा अधिकार हा दुसराच व्यक्ती ईव्हीएमचा बटन दाबून बजावत होता असा आरोप देशमुख यांनी केला आहे.

ML/ML/SL

10 Jan. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *