वर्सोवा- विरार दरम्यान होणार सी- लिंक रोड
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वर्सोवा ते विरार हे अंतर कमी करण्यासाठी राज्य सरकार एक मास्टर प्लॅन तयार करत आहे.यामुळे दोन ते तीन तासांचे हे प्रवासाचे अंतर पाऊणतासात पार करता येणार आहे. एमएमआरडीएने उत्तन ते विरारपर्यंतचा 55 किमीवर लिंक रोड बनवण्यासाठी प्लान तयार केला आहे. त्यामध्ये 24 किमी लांबीचा सी-लिंक असेल. हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर वर्सोवा ते विरार हे अंतर फक्त 45 मिनिटात पूर्ण होईल. म्हणजेच प्रवाशांचा जवळपास सव्वातास वाचणार आहे. हा 55 किमी लांबीचा लिंक रोड बीएमसीद्वारे तयार करण्यात आलेल्या कोस्टल रोडला जोडला जाणार आहे. त्यामुळे वाहतूक अधिक वेगवान होईल.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीने उत्तन (भाईंदर) ते विरार दरम्यान 55 किमी लांब नवीन लिंक रोडसाठी मास्टर प्लान तयार केला आहे. पाच पदरी आणि 19.1 मीटर रूंद लिंक रोडची निर्मिती होणार आहे. या प्रकल्पाला लवकरच मंजुरी मिळेल, या नव्या रस्त्याचा आराखडा (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. सध्या डीपीआरच्या आढाव्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे कोस्टल रोडला कनेक्टिविटी मिळेल. हे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वर्सोवा ते विरार हा प्रवास अवघ्या 45 मिनिटांत पूर्ण करणे शक्य होईल, असे एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी यांनी माध्यमांना सांगितले आहे.
SL/ML/SL
9 Jan. 2025