जालन्यातील मोसंबी मार्केट पुन्हा सुरू…
![जालन्यातील मोसंबी मार्केट पुन्हा सुरू…](https://mmcnewsnetwork.com/wp-content/uploads/2025/01/mosambi-market.jpg)
जालना दि ९:– उत्तरेकडील राज्यात थंडीचा कडाका असल्यानं जालन्यातील मोसंबीची मागणी गेल्या आठवड्यात घटली होती. मागणी घटल्यानं बाजारभाव देखील कोसळले होते. त्यामुळे जालन्यातील मोसंबी मार्केट 8 दिवस बंद ठेवण्यात आलं होतं. दरम्यान जालन्याचं मोसंबी मार्केट पुन्हा सुरू झालं असून मोसंबीला आठ दिवसांपूर्वी असलेला 10 ते 14 हजारांचाच बाजारभाव आज देखील मिळत असल्याने व्यापाऱ्यांबरोबरच शेतकऱ्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे .
दरम्यान शेतकरी सध्याच्या परिस्थितीला वैतागला आहे. मोसंबी कमी भावाने विक्री होत असल्याने शेतकऱ्यांसाठी सरकारने प्रक्रिया उद्योग सुरू करावा. मोसंबीला 20 ते 22 हजार रुपये दर किमान असायला हवा, तरच मोसंबी उत्पादन परवडते अन्यथा मोसंबी उत्पादकांचे काही खरे नाही अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली. तर आताच्या मोसंबीच्या दरात आधीच्या भावापेक्षा जास्त काही सुधारणा झालेली नाही असं मोसंबी व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे.