‘जायकवाडी’त पाणी सोडण्याची जलसाठ्याची अट आता ५८ टक्क्यांवर
छ. संभाजीनगर, दि. ५ (, एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पात पावसाळ्यानंतर पाणी सोडण्यासंदर्भातील जलसाठ्याच्या निकषात बदल करण्यात आला आहे. आता पाणीसाठ्याची अट ६५ वरून ५८ टक्क्यांपर्यत कमी करण्याची शिफारस शासन नियुक्त समितीने शासनाकडे केल्याची माहिती आमदार देवयानी फरांदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दीड वर्षांपूर्वी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेला ही शिफारस करावी लागली आहे, असा दावा आमदार फरांदे यांनी केला आहे. यापुढे जायकवाडीत ५८ टक्के जलसाठा असतानाही नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याची गरज पडणार नाही. या निर्णयामुळे नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांचा पाण्याचा संघर्ष कमी होईल असे फरांदे यांनी सांगितले.
ML/ ML/ SL
5 Jan 2025