मनु भाकर-डी गुकेशसह चौघांना खेलरत्न, 32 जणांना अर्जुन पुरस्कार जाहीर

 मनु भाकर-डी गुकेशसह चौघांना खेलरत्न, 32 जणांना अर्जुन पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : क्रीडा मंत्रालयाने आज देशासाठी विविध क्रीडा प्रकारात 2024 या वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार जाहीर केले आहेत. चेस वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेश आणि ऑलिम्पिकमध्ये भारताला 2 मेडल मिळवून देणारी मनु भाकर यासह एकूण चौघांना यंदाचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच एकूण 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कारने सन्मानित करण्यात येणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येत्या 17 जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात या खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

डी गुकेश, महिला नेमबाज मनु भाकर, हॉकीपटू हरमनप्रीत सिंह आणि पॅरालिम्पिकपटू प्रवीण कुमार या चौघांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच मराठमोळ्या स्वप्नील कुसाळे याच्यासह एकूण 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आलं आहे.

महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.. पॅरिस ऑलिम्पिक २०२४च्या स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने नेमबाजीत कांस्यपदक जिंकले होते. स्वप्नीलच्या गुरु दिपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे. अर्जुन पुरस्कार प्रदान सोहळा हा १७ जानेवारी २०२५ रोजी असणार आहे. अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंना १५ लाख रुपये मिळतात. यावर्षीची पुरस्कार जाहीर झालेल्यांची यादी पाहता त्यात क्रिकेटपटटूंचा समावेश नसल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मान आहे. या सन्मानाअंतर्गत पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूला किंवा खेळाडूला २५ लाख रुपये दिले जातात. यासोबतच ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रही देण्यात आले आहे. यापूर्वी खेलरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंना फक्त ७.५ लाख रुपये मिळत होते, परंतु २०२०मध्ये ते २५ लाख रुपये करण्यात आले.

SL/ML/SL
2 Jan. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *