अखेर वाल्मिक कराड पोलिसांना शरण, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी वाल्मिक कराड सूत्रधार असल्याचा आरोप सातत्याने होत होता. त्याला अटक का केली जात नाही? असा सवाल राज्यभरातून उपस्थित केला होता. मात्र, वाल्मिक कराड हा आता पुणे पोलिसांना आणि सीआयडीला शरण आला आहे. नुकतंच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड तीन आठवड्यांपासून फरार होता. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. त्यामध्ये वाल्मीक कराड याचेही नाव होते. वाल्मीक कराड याचा शोध सीआयडीकडून घेतला जात होता.
ML/ML/PGB
31 Dec 2024