रोहिंग्या आणि बांगलादेशीना मालेगावात दिले जन्मदाखले

नाशिक, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 2024 ह्या वर्षात 1,110 रोहिंग्या आणि बांगलादेशी मुस्लिमांना भारतात मालेगावात जन्म झाल्याचे दाखले देण्यात आले असून डिसेंबर महिन्यात आलेले 400 अर्ज पेंडींग Pending आहेत असा गंभीर आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. आज मालेगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला.
सोमय्या यांनी आज मालेगाव दौरा करून स्थानिक शासकीय अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि नाशिक महापालिका आयुक्त यांनी ही चूक मान्य केली , हे दाखले रद्द करण्यासाठी, सुधारणा करण्यासाठी त्वरित पावले उचलण्याचे मान्यही केले आहे असे ते यावेळी म्हणाले. ह्याचे पुरावे सोमैया यांनी आज मालेगावात प्रसिध्द केले.
मालेगाव हे व्होट जिहादच्या पैशाचे केंद्र झाले आहे. मालेगाव हे बांगलादेशी आणि रोहींग्या मुस्लिमांना जन्म दाखले देण्याचे, त्यांना भारतीयत्व देण्याचे केंद्र बनत आहे असा आरोप ही किरीट सोमय्या यांनी यावेळी केला.
ML/ML/SL
30 Dec. 2024