जालन्यातील मोसंबी मार्केट सात दिवस बंद…
जालना, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बर्फवृष्टी देखील होत आहे. याचा थेट फटका जालन्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय. उत्तर भारतात थंडी असल्यामुळे मोसंबीची मागणी घटल्याने मोसंबीला तीन रुपये किलो ते दहा रुपये किलो पर्यंतचा निचांकी दर मिळतो आहे. उत्तर भारतासह, कानपूर, बनारस या मार्केटमध्ये देखील जालन्याच्या मोसंबीला विक्रीसाठी अडचणी येत असल्याने आजपासून पुढील सात दिवस कृषी उत्पन्न बाजार समितीतील मोसंबी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान या सात दिवसात शेतकऱ्यांनी मोसंबी विक्रीस आणू नये असे आवाहन देखील बाजार समिती प्रशासनाने केले आहे.
ML/ML/SL
30 Dec. 2024