‘राजकोट’ मध्ये शिवाजी महाराज पुतळा उभारणीला सुरुवात…

सिंधुदुर्ग, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीच्या कामाला पुन्हा नव्याने सुरवात झाली आहे. तब्बल 60 फूट उंचीचा नवा पुतळा राजकोट किल्ल्यावर उभारला जाणार आहे. सुप्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार हे हा पुतळा उभारणार आहेत .
हा पुतळा बसवण्यासाठी तीन मीटर उंचीचा चौथरा बांधून त्यावर पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. चौथर्यासाठीच्या खोदकामाला सध्या सुरुवात झालेली आहे. चार महिन्यापूर्वी या ठिकाणी उभारलेला पुतळा दुर्घटना ग्रस्त झाला होता आणि त्याचवेळी सरकारने या ठिकाणी नवीन भव्य पुतळा उभारण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता करण्यास आता सुरुवात झालेली आहे. आधीच्या पुतळा उभारणीतील त्रुटी आणि त्यानंतरच्या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या बाबी विचारात घेऊन नवीन पुतळा उभारताना दक्षता घेण्यात येते आहे.
ML/ML/SL
27 Dec. 2024