पाच वर्षांच्या चिमुकलीवर पोलिसांकडून अत्याचार, नराधमाला अटक

 पाच वर्षांच्या चिमुकलीवर पोलिसांकडून अत्याचार, नराधमाला अटक

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यात चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मावळ तालुक्यातील विसापूर किल्ला परिसरात आई- वडिलांसोबत फिरण्यासाठी आलेल्या पाच वर्षाच्या चिमुकलीवर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाने बुधवारी २५ डिसेंबरला लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून आडोशाला नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सचिन सस्ते या पोलिसाला अटक केली आहे. नाताळची सुट्टी असल्यानं पर्यटक विसापूर किल्ल्यावर गर्दी करत होते. म्हणून किल्ला परिसरात पोलिस बंदोबस्त होता. या पोलिसांत सस्तेचा समावेश होता. कर्तव्यावर असताना सस्ते दारूच्या नशेत होता, असे पोलिसांनी सांगितले.

ML/ML/PGB 26 dec 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *