‘पाताललोक २’ कधी रिलीज होणार
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘पाताललोक’ वेबसीरिज सर्वांना आठवत असेलच. लॉकडाउनमध्ये रिलीज झालेल्या ‘पाताललोक’ वेबसीरिजने प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळवलं. वेबसीरिजचा वेगळा विषय, कथानकाची अनोखी मांडणी अशा अनेक गोष्टींमुळे ‘पाताललोक’ वेबसीरिज लोकांच्या पसंतीस उतरली. आता ‘पाताललोक’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे या वेबसीरिजचा पुढचा सीझन अर्थात ‘पाताललोक २’च्या रिलीज डेटची घोषणा झाली आहे. जाणून घ्या.
प्राइम व्हिडीओने त्यांच्या सोशल मीडियावर ‘पाताललोक २’च्या रिलीज डेटची घोषणा केलीय. ही वेबसीरिज १७ जानेवारी २०२५ ला रिलीज होणार आहे. ‘नवीन वर्षात दरवाजे उघडणार..’ अशी टॅगलाइन देत ‘पाताललोक २’च्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आलीय.
ML/ML/PGB
25 Dec 2024