हिमाचलमधील तूफान बर्फवृष्टीमुळे १५०० वाहने अडकली, ४ जणांचा मृत्यू, अटल बोगदा प्रवाशांसाठी बंद
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सुट्टीमुळे अनेक पर्यटक सध्या हिमालयात गेले आहेत. हिमालयात चांगलीच हिमवृष्टी झाल्यामुळे पर्यंटन स्थळांवर बर्फाची चादर पसरली आहे. तसेच बर्फवृष्टीमुळे ४ जणांचा मृत्यू झाला आहे. पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्यामुळे हिमाचलच्या शिमला, कुल्लू, मनाली इत्यादी शहरांमध्ये लांब ट्रॅफिक जाम आहे. एवढेच नाही तर कुल्लूमधील धुंडी आणि मनाली-लेह महामार्गावरील अटल बोगद्याच्या उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील दरवाजांवर सुमारे 1,500 वाहने बर्फात अडकल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र सध्याची परिस्थिती बघता अटल बोगदा प्रवाशांसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
ML/ML/PGB
25 Dec 2024