अफगाणिस्तानात घुसून पाकिस्तानचा सर्जिकल स्ट्राईक, १५ जणांचा मृत्यू

 अफगाणिस्तानात घुसून पाकिस्तानचा सर्जिकल स्ट्राईक, १५ जणांचा मृत्यू

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अफगाणिस्तानात तालिबानची राजवट सुरु झाल्यानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये शत्रुत्व निर्माण झाले आहे. नुकत्याच झालेल्या दहशतवादी घटनांमुळे हा तणाव आणखी वाढला होता. मंगळवारी पहाटे पाकिस्तानने अफगाणिस्तानात घुसून एअर स्ट्राइक केला आहे. अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतातील बरमल जिल्ह्यात पाकिस्तानने हवाई हल्ले केले. या हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह 15 जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानने हल्ल्यासाठी फायटर जेट्सचा वापर केला. तर, बरमलमध्ये मुर्ग बाजार गाव नष्ट झालं. हवाई हल्ल्यात अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यामुळे दोन्ही देशातील तणाव आणखी वाढला आहे.

ML/ML/PGB
25 Dec 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *