बांके बिहारी मंदिरात ड्रेस कोड लागू
मथुरा,दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भगवान श्रीकृष्णाची नगरी असलेल्या मथुरा-वृंदावन येथील प्रसिद्ध बांके बिहारी मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. याबाबत मंदिर व्यवस्थापनाने बॅनरदेखील लावले आहेत.बांके बिहारी मंदिराचे व्यवस्थापक मुनीश शर्मा आणि उमेश सारस्वत यांनी सांगितले की, मंदिरात भाविकांनी हाफ पँट, बर्मुडा, मिनी स्कर्ट, नाईट सूट, कट आणि फाटलेल्या जीन्स, चामड्याचे बेल्ट आणि इतर तोकडे कपडे घालून येऊ नये. यासंदर्भात मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर ड्रेस कोडबाबत भाविकांना सूचना देण्यात आला आहेत. याआधीही मंदिर व्यवस्थापनाने महिला आणि मुलींना मंदिर परिसरात संपूर्ण शरीर झाकले जाईल असे कपडे घालण्याचे आवाहन केले होते.
SL/ML/SL
24 Dec. 2024