बॅडमिंटन चॅम्पियन पी.व्ही. सिंधू – व्यंकट दत्ता साई विवाहबंधनात
बॅडमिंटन चॅम्पियन पी.व्ही. सिंधू आणि व्यंकट दत्ता साई २३ डिसेंबरला सोमवारी विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नसोहळ्याचा पहिला फोटो समोर आला आहे. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी हा फोटो शेअर करून दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. काहीच दिवसांपूर्वी ते दोघे लग्न करणार असल्याचे जाहीर झाले आहेत. अखेर आज लग्नाचा फोटो शेअऱ करत सिंधूने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.