तब्बल सहा दिवसांनी अखेर खातेवाटप जाहीर …

नागपूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मंत्रिमंडळ विस्तारानंतर अखेर तब्बल सहा दिवसांनी आज राज्याचा खातेवाटप जाहीर झाला असून त्यात अनेक धक्के देण्यात आले आहेत महसूल खाते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे अनेक महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास सोबतच गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग तर अजित पवार यांच्याकडे वित्त विभाग सोबत राज्य उत्पादन शुल्क देखील देण्यात आले आहे
तब्बल सहा दिवसांनी जाहीर करण्यात आलेल्या आजच्या खाते वाटपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे गृह ऊर्जा विधी आणि न्याय तसेच सामान्य प्रशासन हे विभाग ठेवले आहेत तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केवळ कृष्णा खोरे विकास महामंडळाचे जलसंपदा विभाग हे खाते देण्यात आले आहे त्यांच्याकडील महसूल खाते काढून घेण्यात येऊन ते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आले आहे.
इतर खाते वाटप खालील प्रमाणे
हसन मुश्रीफ- वैद्यकीय शिक्षण.
चंद्रकांत पाटील – उच्चआणि तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्य
गिरीश महाजन – जलसंपदा
गणेश नाईक – वने
गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा आणि स्वच्छता
दादा भुसे- शालेय शिक्षण
संजय राठोड – जलसंधारण
धनंजय मुंडे- अन्न आणि नागरी पुरवठा
मंगल प्रभात लोढा– कौशल्य विकास
उदय सामंत — उद्योग आणि मराठी भाषा
जयकुमार रावल– पणन आणि राज शिष्टाचार
पंकजा मुंडे– पर्यावरण आणि पशुसंवर्धन
अशोक उईके — आदिवासी विकास
अतुल सावे– दुग्ध व्यवसाय आणि इतर मागासवर्गीय विभाग
शंभूराज देसाई — पर्यटन
आशिष शेलार– माहिती तथा सांस्कृतिक कार्य
दत्तात्रय भरणे– क्रीडा आणि युवकल्याण तसेच अल्पसंख्य विकास
अदिती तटकरे — महिला आणि बालविकास
शिवेंद्र राजे भोसले– सार्वजनिक उपक्रम
माणिकराव कोकाटे– कृषी
जयकुमार गोरे– ग्रामविकास
नरहरी शिरवळ — अन्न आणि औषध प्रशासन
संजय सावकारे — वस्त्रोद्योग
संजय शिरसाठ — सामाजिक न्याय
प्रताप सरनाईक — परिवहन
भरत गोगावले– फलोत्पादन
मकरंद जाधव — मदत आणि पुनर्वसन
नितेश राणे — मत्स्य व्यवसाय आणि बंदरे
आकाश फुंडकर — कामगार
बाबासाहेब पाटील — सहकार
प्रकाश आबिटकर — सार्वजनिक आरोग्य
तर राज्यमंत्र्यांकडे प्रत्येकी चार ते पाच विभाग सोपवण्यात आले आहेत.
ML/ML/PGB 21 Dec 2024