कल्याणमध्ये मराठी कुंटुंबाला मारहाण प्रकरणी मुजोर अधिकाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई

 कल्याणमध्ये मराठी कुंटुंबाला मारहाण प्रकरणी मुजोर अधिकाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :काल झालेल्या कल्याणच्या एका हायप्रोफाईल सोसायटीमधील प्रकरणा बद्दल मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली महत्त्वाची घोषणा – मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या मुझोर अखिलेश शुक्ला यांचे निलंबन तातडीने करण्यात आले आहे. या घटनेनंतर सरकारने कारवाईचा आदेश दिला आहे. प्रशासनातील अशा घटनांना आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री गंभीर पावले उचलत आहेत. दोषींविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे मराठी समाजात सरकारच्या कठोरतेबद्दल सकारात्मक संदेश गेला आहे.

सरकारने या प्रकारावर कठोर दृष्टी ठेवली असून, अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी कडक उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. समाजातील शांतता आणि एकोपा टिकवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

ML/ML/PGB 20 Dec 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *