थंडीत पाऊसही गरजणार, राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता

राज्यात अनेक ठिकाणी सध्या चांगलीच थंडी पडली आहे. थंडीचा जोर आणखी वाढणार असेही बोलले जात आहे. इतकंच नाही तर, बऱ्याच भागातील तापमान ५ अंश सेल्सियसपपर्यंत खाली आले आहे. थंडीत लोकं गारठले असताना आता हवामान विभागाने राज्यातील काही भागात पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या चार दिवसांत राज्याच्या काही भागांत तुरळक पावसाची शक्यता आहे. १९, २० डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाटमाथा परिसरात तुरळक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. लोकांनी थंडीपासून बचावासाठी काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.