वाढवण बंदर रस्त्याच्या जमीन भूसंपादनाला सुरूवात

 वाढवण बंदर रस्त्याच्या जमीन भूसंपादनाला सुरूवात

पालघर,दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बहुचर्चित वाढवण बंदराच्या रस्त्याच्या भूसंपादन प्रक्रियेला आजपासून सुरूवात झाली. या बंदराच्या रस्त्यासाठी अधिग्रहित केल्या जाणाऱ्या जमिनीची मोजणी होणार आहे. यापूर्वीच मोजणी संदर्भात जमीन मालकांना नोटीसा दिल्या आहेत.दरम्यान प्रक्रियेनुसार घर झाडे , विहिरी, कुपनलिका या घटकांची संयुक्तिक मोजणी केली जाणार आहे. वाढवण बंदराच्या रस्त्यासाठी ५७१ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.

76 हजार 200 कोटी रुपयांचा भव्य प्रकल्प असलेल्या वाढवण बंदराची त्याची क्षमता 298 दशलक्ष टन असेल या बंदरातून 12 लाख रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे”

मुंबई-दिल्ली पश्चिम रेल्वे मार्ग या बंदरापासून अगदी जवळ आहे. यामुळे बंदारात येणारा माल रेल्वेमागनि देशभर पोहोचवता येईल, असं सरकारचं धोरण आहे. यामुळे सरकार या बंदराच्या उभारणीस प्राधान्य देत आहे. प्रस्तावित वाढवण बंदर पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाच्या अंतर्गत येतं. त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार असल्याची कारणे देत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली नव्हती. मात्र, एका वर्षापूर्वीच म्हणजे ३१ जुलै २०२३ रोजी डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणांना या प्रकल्पाला मंजुरी दिली. पुढे फेब्रुवारी २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाच भूमिपूजन करण्यात आलं आहे.

ज्या ठिकाणी वाढवण हे महाकाय बंदर उभारण्यात येणार आहे, ते ठिकाण संवेदनशील असून डहाणू पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाअंतर्गत येतं. मागील 25 हून अधिक वर्षांपासून स्थानिकांचा विरोध आहे. तर दुसऱ्या बाजूला जेएनपीए कडून या बंदराचे फायदे सांगत स्थानिकांचा विरोध कमी करण्याचे काम करत आहे. 1996 पासून डहाणू तालुक्यात लागू करण्यात आलेली उद्योग बंदी नियमावली या प्रकल्पालादेखील लागू राहणार होती. पण 31 जुलै 2023ला डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. वाढवण परिसरातील समुद्रात असणाऱ्या खडकाची रचना पाहता मत्स्यबीज उत्पादनासाठी हा परिसर अनुकूल मानला जातो.

SL/ML/SL

16 Dec. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *