जगातल्या सर्वात श्रीमंत शहरांची यादी जाहीर

 जगातल्या सर्वात श्रीमंत शहरांची यादी जाहीर

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘वर्ल्ड्स रिचेस्ट सिटीज’ अहवालानुसार, न्यूयॉर्क हे जगातील सर्वांत श्रीमंत शहर ठरलं आहे. द बिग ऍपल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात 3 लाख 40 हजार मिलियनर्स, 724 बिलियनर्स आणि 58 ट्रिलियनर्स राहतात. त्यामुळे न्यूयॉर्क हे जगातील सर्वाधिक श्रीमंत शहर ठरले आहे. टोकियो दुसऱ्या आणि सॅन फ्रान्सिस्को तिसऱ्या स्थानावर आहेत. लंडन चौथ्या स्थानावर घसरलं, तर सिंगापूर पाचव्या स्थानावर आहे. हेनले अँड पार्टनर्स या संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला असून, व्यक्तींच्या वैयक्तिक संपत्तीवर आधारित संशोधन करण्यात आले आहे.

या अहवालात श्रीमंत शहरांच्या यादीत न्यूयॉर्कनंतर टोकियो आणि सॅन फ्रान्सिस्को या शहरांची नावे आहेत. टोकियोत 2 लाख 90 हजार 300 तर, सॅन फ्रान्सिस्कोत 2 लाख 85 हजार मिलियनर्स राहतात. ही यादी जगभरातील 9 प्रांतांतील (आफ्रिका, ऑस्ट्रेलिया-आशिया, CIS, पूर्व आशिया, युरोप, मध्य पूर्व, उत्तर अमेरिका, दक्षिण आशिया आणि दक्षिण-पूर्व आशिया) 97 शहरांवरील डेटा आधारित आहे.

या यादीत अमेरिकेतील चार मोठ्या शहरांची नावे आहेत. त्यात न्यूयॉर्क, बे एरिया, लॉस एंजेलिस आणि शिकागो अशी शहरे आहेत. तसेच चीनमधील बीजिंग आणि शांघाय या दोन शहरांनीही या यादीत स्थान मिळवले आहे.या यादीत लंडनचा समावेश चौथ्या क्रमांकावर आहे. लंडनमध्ये सुमारे 2 लाख 58 हजार मिलियनर्स राहतात, ज्यांची संपत्ती 1 मिलियन डॉलर्सपेक्षा अधिक आहे. मात्र, 2000 मध्ये अव्वल असलेले लंडन आता चौथ्या स्थानी घसरले आहे.

सिंगापूर शहर पाचव्या स्थानी आहे. येथे 2 लाख 40 हजार नागरिकांची संपत्ती किमान 1 मिलियन डॉलर्स (सुमारे 8 कोटी 44 लाख रुपये) आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *