पुष्पा 2 चेंगराचेंगरी मृत्यू प्रकरणात अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन मंजूर

 पुष्पा 2 चेंगराचेंगरी मृत्यू प्रकरणात अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन मंजूर

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पुष्पा 2’ चित्रपटाच्या स्क्रिनिंग दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनला आज अटक करण्यात आली. अल्लू अर्जुनला मेडीकल केल्यानंतर कोर्टात हजर करण्यात आलं. त्याला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

साऊथ सुपरस्टार आणि ‘पुष्पा 2’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेल्या अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. पण त्याला आता अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. अर्जुनला संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीप्रकरणी हैदराबादमधील चिक्कडपल्ली पोलिसांनी आज अटक केली होती. अल्लू अर्जुन संध्या थिएटरमध्ये आला होता, त्यावेळी त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुंबड गर्दी केली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. अल्लू अर्जुनला अटक केल्यानंतर गांधी हॉस्पिटलमध्ये त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. नंतर त्याला नामपल्ली कोर्टात हजर करण्यात आलं.

ML/ML/PGB 13 Dec 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *