किल्ले रायगडावर पर्यटकांसह शाळकरी मुलांची गर्दी

महाड, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील महाड येथील असलेल्या किल्ले रायगडवर मोठ्या संख्येने पर्यटक आणि शालेय विद्यार्थी सहलीसाठी येत आहेत. हिवाळा ऋतूत आणि विशेष करून डिसेंबर महिन्यात पर्यटक वर्ग मोठ्या संख्येने फिरण्यासाठी बाहेर पडतात.

शाळकरी मुलांच्या प्रासंगिक करार सहली देखील या महिन्यात पर्यटनासाठी मोठ्या संख्येने रायगड जिल्ह्यात येत असतात. सध्या किल्ले रायगड पाहण्यासाठी घाटमाथ्यावरील पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत यातच मराठवाडा, विदर्भ पश्चिम महाराष्ट्र, पुणे, कोकण भागांतील सहलींची मोठी गर्दी किल्ले रायगडावर झालेली पहायला मिळत आहे.
रायगड किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे खालील प्रमाणे आहेत.
- सिंहासनाचा समोरील बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच नगारखाना
- शिवराज्याभिषेक पाचाडचा जिजाबाईंचा वाडा खुबलढा बुरूज
- नाना दरवाजा मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा
- महादरवाजा
- चोरदिंडी
- हत्ती तलाव
- गंगासागर तलाव
- स्तंभ
- पालखी दरवाजा
- मेणा दरवाजा
- राजभवन
- रत्नशाळा
- राजसभा
- नगारखाना
- बाजारपेठ
- शिरकाई देऊळ
- जगदीश्वर मंदिर
- महाराजांची समाधी
- कुशावर्त तलाव
- वाघदरवाजा
- टकमक टोक
- हिरकणी टोक
- वाघ्या कुत्र्याची समाधी.
ML/ML/SL
13 Dec. 2024