काकांचा ८५ वा वाढदिवस, दादांना करमेना, दिल्लीत गेले भेटीला
शरद पवारांचा आज ८५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने काकांच्या भेटीसाठी दादा अर्थात अजित पवारांनी आज दिल्लीतील निवासस्थानी जाऊन पवारांची भेट घेतली आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार, छगन भुजबळ, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, लेक पार्थ पवारही सोबत होते. पक्षफुटीनंतर पवार काका-पुतण्या यांच्यात पहिलीच अधिकृत भेट आहे.