रितेश-जिनिलियाने विकत घेतला वर्ल्ड पिकलबॉल लीग मधील हा संघ

 रितेश-जिनिलियाने विकत घेतला वर्ल्ड पिकलबॉल लीग मधील हा संघ

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चित्रपट क्षेत्रातील लोकप्रिय जोडी रितेश आणि जेनेलिया देशमुख आता क्रीडा क्षेत्रातील प्रायोजक म्हणून समोर येत आहेत. यांनी आता जागतिक लीगमधील (World Pickleball League) पुण्याचा संघ विकत घेतला आहे. वर्ल्ड पिकलबॉल लीग २४ जानेवारी २०२५ पासून सुरू होईल. भारताचे माजी टेनिस खेळाडू गौरव नाटेकर व आरती पोनाप्पा नाटेकर यांची नाटेकर स्पोर्ट्स अँड गेमिंग ही संस्था द वर्ल्ड पिकलबॉल लीगचे प्रवर्तक आहे. हे भारतात पिकलबॉलमध्ये क्रांती घडविण्यात आघाडीवर आहेत. पुढील वर्षी जानेवारी महिन्यापासून सहा संघांसह वर्ल्ड पिकलबॉल लीगची सुरुवात होणार आहे. रितेश आणि जेनेनिया यांनी या लीगमध्ये पुण्याचा संघ विकत घेतला आहे. या संघाचे नाव पुणे युनायटेड, असे ठेवण्यात आले आहे.

याबाबत रितेश देशमुख म्हणाला की, “पिकलबॉल जगभरात हा वेगाने वाढत जाणारा क्रीडाप्रकार आहे. सर्व वयोगटांमध्ये त्याची क्रेझ व लोकप्रियता प्रचंड आहे. वर्ल्ड पिकलबॉल लीगचा एक भाग होताना आम्ही अत्यंत रोमांचित आहोत. या लीगमुळे पिकलबॉल भारतात निश्चितच नव्या उंचीवर पोहोचेल. पुणे युनायटेडकडून आमचा प्रयत्न आहे की असा संघ तयार करावा जो खेळाडूंना आपले सर्वोत्तम देण्यासाठी प्रेरित करेल. तसेच ही लीग सर्वांना एकत्र आणून या अद्भुत खेळाचा स्वीकार करण्यासाठी आणि अधिक आरोग्यपूर्ण व तंदुरुस्त जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन देईल.”

SL/ML/SL

11 Dec. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *