लातूरमध्ये कार- ट्रकच्या भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू

लातूरमध्ये मंगळवारी झालेल्या कार आणि ट्रकच्या अपघतात चौघांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन जण गंभीर जखमी आहेत. हे सहाही जण लातूरच्या रेणापूर तालुक्यातील कारेपूर गावचे रहिवासी होते. मित्राची पोलीस भरतीत निवड झाल्याने ते पार्टी करण्यासाठी गेले होते. पार्टी करून घरी परतताना त्यांच्या कारला ट्रकने धडक दिली. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.