कुर्ला बेस्ट बस अपघात; चालक संजय मोरेला अटक, आज कुर्ला स्टेशनवरून सुटणाऱ्या बसही बंद

 कुर्ला बेस्ट बस अपघात; चालक संजय मोरेला अटक, आज कुर्ला स्टेशनवरून सुटणाऱ्या बसही बंद

मुंबईतल्या कुर्ल्यात बुद्ध कॉलनीजवळ सोमवारी रात्री(९ डिसेंबर) झालेल्या बेस्ट बसच्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकांना धडक दिल्याने यात 30 ते 35 जण गंभीर जखमी झाले आहेत. जेव्हा हा अपघात घडला तेव्हा अपघातग्रस्त बसमध्ये तब्बल 60 प्रवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. संजय मोरे या बस चालकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान मंगळवारी पोलिसांनी कुर्ला स्टेशनच्या बसेस बंद केल्या आहेत. कुर्ला स्टेशन वरुन वांद्रे, सांताक्रूज, अंधेरीला जाणाऱ्या सर्व बसेस आज १० तारखेला बदं करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *