भारताच्या डिजिटल निर्यातीत दुपट्टीने वाढ

 भारताच्या डिजिटल निर्यातीत दुपट्टीने वाढ

नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या भारताने डिजिटल निर्यातीच्या बाबतीत जागतिक क्रमवारीत चौथे स्थान मिळवले आहे. या यादीत भारताच्या पुढे अमेरिका, ब्रिटन आणि आयर्लंड ही राष्ट्र आहेत. जागतिक व्यापार संघटनेनुसार, भारत 2023 मध्ये 257 अब्ज डॉलरच्या डिजिटल वस्तूंची निर्यात करेल. 2022 मध्ये भारताच्या डिजिटल निर्यातीत 17 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कालावधीत चीन आणि जर्मनीच्या निर्यातीत चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारताची निर्यात चार वर्षांत दुप्पट झाली आहे. गेल्या दोन दशकांत डिजिटल पद्धतीने पुरवल्या जाणाऱ्या सेवांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जागतिक सेवा व्यापारातील भारताचा वाटा 20 टक्क्यांवर पोहोचला आहे.

डिजिटल निर्यात म्हणजे काय?

डिजिटली वितरित सेवांमध्ये व्यावसायिक सेवा संगणक नेटवर्कद्वारे प्रदान केल्या जातात. गेल्या वर्षी त्याची जगभरातील निर्यात 4251 अब्ज डॉलर्सची होती. यामध्ये अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी अमेरिकेने 649 अब्ज डाॅलर किमतीच्या डिजीटल वितरण सेवांची निर्यात केली. यानंतर ब्रिटन डिजिटली वितरित सेवांची निर्यात 438 अब्ज डाॅलर होती. आयर्लंडने 328 अब्ज डाॅलर किमतीच्या डिजिटली वितरित सेवा निर्यात केल्या. या यादीत जर्मनी 248 अब्ज डॉलरसह पाचव्या स्थानावर आणि चीन 207 अब्ज डॉलरसह सहाव्या क्रमांकावर आहे.

SL/ML/SL

9 Dec. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *