आता आंघोळीचा कंटाळा संपेल – १५ मिनिटांत स्वच्छतेचा नवा अनुभव!
जपानने विज्ञान-तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मानवांसाठी अनोख्या प्रकारची ‘धुणारी वॉशिंग मशीन’ विकसित केली आहे. ही मशीन एका कॅप्सूलसारखी असून, व्यक्ती आत झोपल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत त्यांचे शरीर पूर्णतः स्वच्छ करते. आंघोळ करण्याचा वेळ व श्रम वाचवत, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही मशीन त्वचेची काळजी घेत स्वच्छता प्रदान करते.
नव्या युगाच्या तंत्रज्ञानाच्या दिशेने उचललेले हे पाऊल स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.