विधानसभेचे नवीन अध्यक्ष नार्वेकर च, आज घेतली 106 जणांनी शपथ

 विधानसभेचे नवीन अध्यक्ष नार्वेकर च, आज घेतली 106 जणांनी शपथ

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा ॲड. राहुल नार्वेकर यांची दुसऱ्यांदा निवड होणार होणे निश्चित झाले असून अध्यक्षपदासाठी आज दुपारी मुदत संपेपर्यंत भाजपचे राहुल नार्वेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला त्यामुळे त्यांची निवड ही केवळ औपचारिकता बाकी आहे.

विधानसभेच्या आजच्या कामकाजात 106 सदस्यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली . यात दोन जणांनी संस्कृत मध्ये तर एका सदस्यांनी अहिराणी भाषेमध्ये शपथ घेतली. मंगल प्रभात लोढा आणि सत्यजित देशमुख यांनी संस्कृतमध्ये तर अनुप अग्रवाल यांनी अहिराणी भाषेमध्ये शपथ घेतली. काल 287 पैकी 173 जणांनी शपथ घेतली होती आणि आज 114 जण शपथ घेणे अपेक्षित होते मात्र आज प्रत्यक्षात 106 जणांनी शपथ घेतली.

विनय कोरे, जयंत पाटील, उत्तम जानकर, शेखर निकम, विलास भुमरे, वरुण सरदेसाई, मनोज जामसुतकर आणि सुनील शेळके असे आठ सदस्य शपथ घ्यायचे शिल्लक राहिले आहेत. उद्या ते आल्यास त्यांना शपथ दिली जाईल अथवा नंतर अध्यक्षांच्या दालनात ती दिली जाईल.

उद्या नवीन अध्यक्षांची निवड झाल्यानंतर लगेच नवीन सरकारवरील विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेण्यात येईल आणि सायंकाळी राज्यपाल दोन्ही सभागृहातील सदस्यांसमोर अभिभाषण करतील , त्यावरील चर्चा नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात होईल.

ML/ML/PGB
8 Dec 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *