अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी तारणमुक्त कर्ज मर्यादेत वाढ

Farmer
मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
देशात मोठ्या संख्येने असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी RBI ने काल एक महत्त्वपू्ण निर्णय घेतला आहे. कृषी निविष्ठांचे वाढते खर्च आणि महागाईचा चढता आलेख लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत शेतकऱ्यांसाठी तारणमुक्त कर्जाची मर्यादा १.६६ लाख रुपयांवरून २ लाख रुपये केली आहे. शेतीसंबंधित वाढते खर्च आणि एकंदर महागाईचा वाढता पारा लक्षात घेऊन, शुक्रवारी रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला. यामुळे लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कर्ज उपलब्धता वाढणार आहे.
आघाडीच्या बँकांना तारणमुक्त कर्जाच्या योजनेसंबंधित सूचना लवकरच देण्यात येईल, असे मध्यवर्ती बँकेकडून सांगण्यात आले. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्यासाठी तारण म्हणून मालमत्ता गहाण ठेवण्याची आवश्यकता नसते. वर्ष २०१९ मध्ये तारण मुक्त कृषी कर्जाची मर्यादा मध्यवर्ती बँकेने १ लाख रुपयांवरून १.६ लाख रुपयांपर्यंत वाढवली होती.
केंद्र सरकारच्या आर्थिक सेवा विभागाने, अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या अडचणी आणि आर्थिक संकट लक्षात घेता ३ लाख रुपयांपर्यतच्या पीक कर्जासाठी प्रक्रिया, दस्तऐवज, तपासणी आणि खातेवही शुल्क आणि इतर सर्व सेवा शुल्क देखील माफ केले आहे.
SL/ML/SL
7 Dec. 2024