सर्पमित्रांनी दुर्मिळ विषारी सापाला दिले जीवनदान.

अलिबाग, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अत्यंत दुर्मिळ मात्र विषारी असणाऱ्या स्लेंडर कोरल सर्प (Slender coral snake (Calliophis melanurus) (रातसर्प / पोवळा) आणि दहा फुटी अजगर यांना सर्पमित्रांनी पकडून त्याला चिरनेर वनपरिक्षेत्रात मुक्त केले आहे.
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चिरनेर येथून भारतीय अजगर (Indian rock python) या १० फूट भल्या मोठ्या अजगराला फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) चे उपाध्यक्ष राजेश पाटील आणि स्वयंसेवक मोहन पाटील यांनी पकडून चिरनेर वनपरिक्षेत्रात त्यास मुक्त केले.
त्याच दिवशी चिरनेर येथील सुरस बुक स्टॉल येथून एका दुकानाजवळ शाळेच्या विद्यार्थ्यांनी साप पाहिला आणि दुकानाच्या मालकाला त्याबाबत कल्पना दिली, त्यांनी सर्पमित्र राजेश पाटील ह्यांना संपर्क केला. सर्पमित्र राजेश पाटील आणि मोहन पाटील ह्यांनी तो साप Slender coral snake (Calliophis melanurus) स्लेंडर कोरल सर्प (रातसर्प / पोवळा) असल्याचे सांगितले.
स्लेंडर कोरल हा साप भारतात सर्वत्र आढळणारा आकाराने सर्वात छोटा विषारी साप असून अत्यंत दुर्मिळ आहे.
स्लेंडर कोरल या सापाला पकडून त्यास देखील चिरनेर वनपरिक्षेत्रात मुक्त केले.
ML/ML/PGB 5 Dec 2024