धक्कादायक! युनायटेड हेल्थ केअरचे सीईओ ब्रायन थॉम्पसन यांची गोळा घालून हत्या

 धक्कादायक! युनायटेड हेल्थ केअरचे सीईओ ब्रायन थॉम्पसन यांची गोळा घालून हत्या

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आरोग्य क्षेत्रात सेवा देणाऱ्या युनायटेड हेल्थकेअर कंपनीचे सीईओ ब्रायन थॉम्पसन यांची हत्या करण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. मॅनहट्टन शहरातील एका हॉटेलबाहेर ब्रायन थॉम्पसन यांच्यावर एका व्यक्तीने गोळ्या झाडल्या. ब्रायन थॉम्पसन हे मॅनहट्टनमध्ये होते. एका हॉटेलच्या बाहेर असताना बुधवारी सकाळी ६.४५ वाजता त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. थॉम्पसन हे या हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका वार्षिक गुंतवणूक परिषदेत सहभागी होण्यासाठी आले होते. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.

ML/ML/PGB 5 Dec 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *